*(संचमान्यता 2021-22) आपल्या शाळेच्या प्रत्यक्ष पटावर असलेली विद्यार्थीसंख्या पोर्टलवरील संख्येशी का जुळत नाही❓*
▪▪▪➖▪▪▪
*_खालील सर्व बाबींची वेळच्यावेळी पूर्तता केली असेल तरच पोर्टलमधील संख्या प्रत्यक्ष पटाशी जुळते._*
➡ *_मागील वर्षातील विद्यार्थ्यांचे पुढील वर्षात प्रमोशन करणे (1ली ते 8वी पर्यंतचे 20-21 मधील सर्व विद्यार्थी RTE 2009/16 नूसार पुढील वर्गात प्रमोट करायचे आहेत),_*
➡ *_चालू शैक्षणिक वर्षातील इयत्ता 1ली मध्ये दाखल सर्व विद्यार्थी स्टुडंट पोर्टलमधील download personal/upload personal टॅब मधून पोर्टलला दाखल करणे,_*
➡️ *2021-22 मध्ये वयानूसार प्रवेश दिलेला असल्यास सदरील विद्यार्थ्याचे पूर्वी कोणत्याही शाळेत नाव दाखल नाही याबाबत खात्री करून घेऊन मा. ग.शि.अ.यांच्याकडे अर्ज दाखल करून टॅब मागवून घ्यावी व टॅब प्राप्त झाल्यास त्याच दिवशी अशा विद्यार्थ्याचे नाव पोर्टलला दाखल करावे.* (ही टॅब फक्त 12 तासच आपल्या पोर्टलला राहिल)
➡ *_आपल्या शाळेतून टीसी घेऊन गेलेल्या विद्यार्थ्यांच्या रिक्वेस्ट आलेल्या असतील तर अप्रूव करणे आलेल्या नसल्यास सदरील शाळेच्या मु.अ.चा संपर्क क्र. पोर्टलमधे शोधून अशा विद्यार्थ्यांच्या रिक्वेस्ट पाठविण्याबाबत त्यांना विनंती करणे,_*
➡ *_इतर शाळेतून आपल्या शाळेत टीसी सह आलेल्या विद्यार्थ्यांच्या रिक्वेस्ट सबंधित शाळांना पाठविणे. रिक्वेस्ट_* *_पाठविलेला विद्यार्थी आपल्या शाळेच्या पोर्टलला दिसत नसेल तर (रिक्वेस्ट अप्रूव्ह झाली नसल्यास) संबंधित शाळेच्या मुअ शी संपर्क साधून आपण पाठविलेल्या रिक्वेस्ट अप्रूव करण्याबाबत विनंती करणे._*
*_Request पाठविण्यासाठी विद्यार्थी सदरील शाळेत संबंधित वर्गात दिसत नसल्यास request out of school टॅब चा वापर करून सबंधित शाळेने सदरील विद्यार्थ्यास out of school केले असल्यास व तेथे तो विद्यार्थी दिसत असल्यास त्याची ट्रान्सफर रिक्वेस्ट पाठविता येईल, तेथेही तो दिसत नसल्यास व टीसीवर त्याचा सरल आयडी लिहिलेला असल्यास search student टॅबचा वापर करून सदरील विद्यार्थी कोणत्या शाळेत आहे ते शोधून त्या शाळेला रिक्वेस्ट पाठवावी._*
➡ *_मागील काळात काही शाळांनी चुकीच्या विद्यार्थ्यांच्या रिक्वेस्ट अप्रूव केल्यामूळे शाळेत असणारा विद्यार्थी ट्रान्सफर झाल्याची उदाहरणे आहेत, त्यामूळे आपल्या शाळेतून टीसी घेऊन गेलेल्या विद्यार्थ्यांची यादी एका स्वतंत्र वहीत लिहावी व तेथे पाहूनच रिक्वेस्ट अप्रूव करावी व लगेच टीकमार्क करावे म्हणजे चुकीचा विद्यार्थी ट्रान्सफर होणार नाही._*
➡ *_सध्या अस्तित्वात असलेल्या कोणत्याही नियमानूसार विद्यार्थ्याचे नाव पोर्टलमधून सरळ काढून टाकता येत नाही. (delete studentही सुविधा फक्त duplicate म्हणजेच विद्यार्थ्याचे नाव ,आईचे नाव व जन्मदिनांक या तिन्ही बाबी सारख्याच असलेले दोन विद्यार्थी पोर्टलला दिसत असतील तरच वापरता येते किंवा पोर्टलला दाखल विद्यार्थी मयत झाल्यास वापरता येते) काही शाळांमध्ये सतत अनुपस्थित या कारणास्तव विद्यार्थी पटावरून कमी केलेले आढळतात ,अशा विद्यार्थ्यास प्रवेश निर्गम रजिस्टरला नाव कमी न करता पोर्टलमध्ये out of school करावे.विद्यार्थी कुटुंबासह स्थलांतरीत झाल्यामूळे पटावरून नाव कमी केले असल्यास किंवा विद्यार्थ्याने टीसी घेतली परंतू परराज्यात शिकण्यासाठी गेला असल्यास पोर्टलला देखील अशा विद्यार्थ्यास लगेच out of school करावे._*
▪▪▪➖▪▪▪
sharadkurundkar.blogspot.com
या शैक्षणिक ब्लॉगवर संग्रहित.
▪▪▪➖▪▪▪