📚 *~YCMOU B.ED.2018-20~*प्रवेश प्रक्रिया महत्वाचे
या वर्षी www.ycmou.digitaluniversity.ac.in या website वर गेल्यानंतर समोर वरून पाचव्या क्र. वर दिसणाऱ्या "click here for admission to B.ED.for academic year 2018-20 शैक्षणिक वर्ष २०१८-२० साठी बीएड शिक्षणक्रम प्रवेशासाठी येथे क्लिक करा "या लिंक वर क्लिक केल्यास मुख्य पेज ओपन होईल व त्यानंतर सुरुवातीला registration केल्यानंतर आपणास आपण नोंदविलेल्या मोबाईल क्र. वर लॉगीन आय.डी. व पासवर्ड मिळेल तो वापरून परत लॉगीन करावे व डाव्या बाजूला दिसणाऱ्या application menu खाली दिसणाऱ्या 1)"fill / Edit application form " या लिंक वर क्लिक करून फॉर्म भारता येईल. संपूर्ण फॉर्म भरल्यानंतर 2 )pay/view application fee या लिंक वर क्लिक करून फीस भरता येईल.तसेच त्याखाली दिसणाऱ्या print menu खाली असलेल्या "print application form" वर क्लिक करून आपल्या फॉर्म ची प्रिंट काढता येईल.खालील पोस्ट चा अभ्यास केवळ फॉर्म भरताना कोणती कागदपत्रे लागू शकतील तसेच आपली सेवा आणि शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेनुसार गुणदान करावयाची विद्यापीठाची पद्धती या बाबींच्या अभ्यासासाठी करावा ,यावर्षी कोणतीही कागदपत्रे अपलोड करण्याची आवश्यकता नाही हि बाब लक्षात घ्यावी.या वर्षीच्या प्रवेश प्रक्रीये मध्ये बदल झाला असून फक्त आपली सही व फोटो शिवाय कोणतीही कागदपत्रे अपलोड करण्याची आवश्यकता नाही.आपण पूर्ण केलेल्या पदवी/पदव्युत्तर /प्रमाणपत्र अभ्यासाक्रमाच्या प्रमाणपत्रावरील सर्व माहिती व तारखा ओनलईन फॉर्म भरताना व्यवस्थित नोंदवाव्यात .शेवटी आपली सही व फोटो (आपल्याकडे य.च.म.मु.वि. चा १४ अंकी prn क्र. असल्यास फोटो व सही आपोआपच येयील .त्यानंतर ची पायरी म्हणजे फीस भरण्याची सर्वसाधारण प्रवर्गास ४०० रु. व आरक्षित प्रवर्गास २०० रु. प्रक्रिया फीस आपल्याला भरावयाची असून क्रेडीट कार्ड /डेबिट कार्ड/नेट बँकिंग यापैकी एक पर्याय निवडून आपल्याला हि फीस भरता येईल.फीस भरल्यानंतर आपल्याला आपण भरलेल्या फॉर्म ची प्रिंट मिळू शकेल.
🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹
शरद कुरूंदकर,सहशिक्षक,किनवट,जि.नांदेड
⇉⇉⇉⇉⇉⇉⇉⇉⇉⇉⇉⇉⇉⇉⇉⇉⇉⇉⇉⇉⇉⇉⇉⇉⇉⇉⇉⇉
📚🎓🎓 *~YCMOU B.ED.2016-17~*प्रवेश प्रक्रिया महत्वाचे 🎓🎓📚📚
💎💎💎💎💎💎💎💎💎
sharadkurundkar.blogspot.in
📱8888477044
*Dnyansadhana educational blog*
💎💎💎💎💎💎💎💎💎
मित्रांनो य.च.म.मु.विद्यापीठाची बि.एड. प्रवेश प्रक्रिया दिनांक 21 जुलै पासून सुरू झाली असून ही प्रक्रिया संपूर्णपणे अॉनलाईन असून गुंतागुंतीची असल्यामुळे प्रक्रिया नीट समजून घेऊन प्रवेशासाठी नोंदणी व अॉनलाईन प्रवेश अर्ज भरणे या बाबी कराव्यात.आपण अर्ज भरताना काहि चूक झाल्यास अथवा अपूर्ण वा चुकीची माहिती भरली गेल्यास प्रवेश प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर आपणांस बाद केले जाऊ शकते .प्रवेश अर्ज भरताना खालील प्रक्रियेचा अवलंब करावा.हा अर्ज आपणांस स्वत: किंवा MKCL च्या अधिकृत केंद्रावरुन भरता येईल. *online* बसण्यापूर्वी पुढील माहिती/कागदपत्रे आपल्या जवळ असल्याची खात्री करुन घ्या 👉जन्म तारखेचे प्रमाणपत्र (नसल्यास 10 वी सनद)☄☄आपणांस राखीव प्रवर्गातून फॉर्म भरावयाचा असल्यास जातीचे प्रमाणपत्र(जातवैधता प्रमाणपत्र सुद्धा आवश्यक असून आपली निवड झाल्यास प्रवेशावेळी तपासून घ्यावे लागेल.) ☄ तसेच *sc*व *st* वगळता इतर सर्व वर्गांसाठी ,सध्या वैध असलेले नॉनक्रिमीलेयर प्रमाणपत्र ☄ प्राथमिक शिक्षक असल्याचे E.o./Beo/Hm/Aayukt यांनी सत्यापित केलेले शिफारस प्रमाणपत(प्रॉस्पेक्ट मध्ये दिलेले आहे)सेवेत नियुक्ती आदेश / असल्यास ,पदवीधर नियुक्ती आदेश ,सेवापुस्तिका(सर्व पेजेस) ☄ मुख्याध्यापकांच्या सहीचे अनुभव प्रमाणपत्र.☄मेंटॉर प्रमाणपत्र(प्रॉस्पेक्ट मध्ये दिलेले आहे.) ☄ डि.एड./डि.टी.एड. गुणपत्रिका☄ डि.एड./डि.टी.एड प्रमाणपत्र.☄,पदवी,पदव्युत्तर गुणपत्रिका ☄पदवी ,पदव्युत्तर प्रमाणपत्रे.☄लागू असल्यास राजपत्राची प्रत.ही सर्व कागदपत्रे स्कॅन करून ठेवावीत.वरील क्रमानेच हि कागदपत्रे आपल्याला अपलोड करावयाची आहेत.☄आपला फोटो आणि सहीचा नमूना स्कॅन करून ठेवावा.(width-3.375 inch/height -2.125 inch/ resolution-72 pixel/file size-max 30kb/format-any) ☄ कागदपत्रे *jpg,jpeg,png,bmp,zip,rar,pdf* फॉर्मेट मध्ये स्कॅन केलेली चालतील परंतू फाईल साईझ 150kb पेक्षा अधिक असू नये.एका पेक्षा अधिक पेजेस अपलोड करावयाची असल्यास , सर्व पेजेस एका folder मध्ये टाकून ते folder अपलोड करावे .
ही सर्व पूर्व तयारी झाल्यानंतरच फॉर्म भरायला सुरुवात करा.
💥1) सर्वप्रथम www.ycmou.digitaluniversity.ac या वेबसाईट वर जा.
💥2) दर्शनी पृष्ठावर बि.एड प्रवेश 2016-17 दिसेल त्यावर क्लिक करा.
💥3) या पेज वर सर्वात वर Register online हे बटण दिसेल त्यावर क्लिक करा. या पेज वर विद्यापीठाचे नियम व अटी असून त्या नीट वाचून त्याखाली असलेल्या *Accept* या बटणवर क्लिक करा
💥3) या पेज वर आपणास आपली बिएड. प्रवेशासाठीची पात्रता तपासून पाहावयाची आहे,त्यासाठी चार प्रश्न विचारलेले असून चारही प्रश्नांचे आपले उत्तर *Yes* असेल तर खाली असलेल्या *Proceed*या बटणवर क्लिक करा.(दूरस्थ /पत्रद्वारा डि.एड. केलेले शिक्षक प्रवेशासाठी अपात्र आहेत)💥4) या पेज वर ,आपण जर 2008 नंतर ycmou विद्यापीठात कोणताही अभ्यासक्रम पूर्ण केलेला असेल व आपणाकडे 16 अंकी PRN असल्यास *Yes* ,नसेल तर *No* सलेक्ट करा.आपण जर *Yes*सलेक्ट केले तर लगेच त्याखाली नवीन विंडो ओपन होईल त्यात आपला 16 अंकी PRN भरा व खाली असलेल्या *Save & proceed*या बटणवर क्लिक करा.आपल्याकडे 16 अंकी PRN असल्यास पुढच्या पेज वर बरीच माहिती आधीच भरलेली दिसेल शिवाय आपली सही व फोटो स्कॅन केलेला दिसेल त्यात काही बदल करावयाचा नसल्यास तसाच ठेवून *Save & proceed* वर क्लिक करा .
💥5) यानंतरच्या पेज वर आपणांस आपले नाव ,जन्मदिनांक ,पत्ता व इतर माहिती भरावयाची आहे .येथे महत्वाचे म्हणजे अभ्यासकेंद्राचा जिल्हा सलेक्ट करतांना आपली शाळा ज्या जिल्ह्यात आहे तोच जिल्हा सलेक्ट करा समोर संकेतांक आपोआपच येईल.त्याखाली आपला पत्ता लिहून पत्याशी संबंधित इतर माहिती भरा. मोबाईल क्रमांक लिहा व असल्यास ई मेल आयडी. भरा.व त्याखाली असलेल्या *Save & Proceed* या बटणवर क्लिक करा.लगेच आपण लिहिलेल्या मोबाईल वर एकवेळ वापरावयाचा पासवर्ड येईल.
💥6) या पेज वर ,आपल्या मोबाईल वर आलेला एकवेळ वापरावयाचा पासवर्ड भरा.त्याखाली असलेल्या *Verify OTP* या बटणवर क्लिक करा.
💥7) या पेज वर आपणांस आपला संपूर्ण प्रक्रियेमध्ये वापरावयाचा *Login ID* व *Password* दिसेल तो लिहून घ्या ,मोबाईलने फोटो काढा अथवा प्रिंट काढा.प्रिंट काढणेच सोईस्कर होईल. खाली असलेल्या *Save &Proceed to fill application form* या बटणवर क्लिक करा.
💥8) या पेजवर वर मार्गदर्शक सूचना दिसतील.डाव्या बाजूला असलेल्या *Fill/Edit Application form या लिंक वर क्लिक करा व वरील मार्गदर्शक सूचनांनूसार फॉर्म भरायला सुरुवात करा.संपूर्ण फॉर्म भरल्यानंतर जनरेट होणारे ई चलन विद्यापीठाने नियुक्त केलेल्या बँकेत भरा. बँकेने तुमच्या चलनावर ट्रँझॅक्शन नंबर टाकला आहे याची खात्री करुन घ्या.प्रोसेसिंग शुल्क खुल्या प्रवर्गासाठी 400₹ तर राखीव प्रवर्गांसाठी 200₹ भरावयाचे आहेत. किंवा Netbanking द्वारे देखील फीस भरण्याचा पर्याय उपलब्ध आहे .
💥9) आता परत एकदा आपल्याला अॉनलाईन जाऊन क्र.1 व 2 मधील सूचनेनूसार बि.एड. प्रवेश प्रक्रियेचे पेज ओपन करावे लागेल व पूर्वीच आपल्याकडे असलेल्या *Login ID व पासवर्डने* आपला फॉर्म ओपन करुन *pay application Fee* यात आपल्या ई चलनावरील ट्रँझॅक्शन नंबर भरुन आपला फॉर्म अॉथेंटीक करावा लागेल.
या सर्व पाय-या यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर आपल्याला आपला प्रवेश अर्ज भरला गेल्याचा मेसेज
येईल,ज्या विद्यार्थ्यांना असा मेसेज येईल तेवढेच अर्ज
प्रवेशासाठी विचाराधीन ग्राह्य धरले जातात असे माहिती पत्रकात सांगितलेले आहे , परंतु Netbanking द्वारे फीस भरल्यास असा मेसेज येत नसल्याचे बर्याच जणांनी कळविले आहे ,.
यानंतरही गुणवत्ता यादीत आलेल्या उमेदवारांना मुलाखतीसंदर्भातील माहिती केवळ विद्यापीठाच्या वेबसाईटवरच कळविली जाते, तसेच गुणवत्ता
यादीसुद्धा वेबसाईटवरच प्रसिद्ध केली जाते.त्यामूळे
वेळोवेळी वेबसाईट ला भेट देणे ही उमेदवारांची
जबाबदारी आहे.
निवड प्रक्रिया/गुण देण्याची पद्धत -
1] अनुभवाच्या प्रत्येक वर्षासाठी 1गुण ,वरच्या 6 महिन्यापर्यंत 0 व 6
महिन्यांपेक्षा जास्त सेवेला एक गुण. +
2] पदवीच्या श्रेणीला पुढीलप्रमाणे गुण O-6/A-5/B-4/C-0 +
3] पदव्युत्तर श्रेणीला पुढील प्रकारे गुण A किंवा O-5/B-4/C-3 +
4] डि.एस.एम. अथवा समकक्ष श्रेणीला पुढील प्रकारे गुण A किंवा O-5/B-4/C-3 +
5] पदवीधर वेतनश्रेणी मिळालेली असल्यास वेतनश्रेणी मिळाल्यानंतरच्या प्रत्येक वर्षासाठी एक अतिरिक्त गुण मिळतो,परंतु पाच वर्षात बी.एड. करणे आवश्यक असल्याचे नियोक्त्याचे प्रमाणपत्र आपल्याकडे असणे आवश्यक आहे .
वरीलप्रमाणे गुणदान केल्यानंतर अंतिम गुणवत्ता यादीत समान गुण असतील तर प्रथम अनुभवाचा आणि नंतर वयानूसार ज्येष्ठतेचा विचार केला जातो जर वय देखील समान असेल तर पदवी उत्तिर्णतेची ज्येष्ठता विचारात घेत
ली जाते.
वेळापत्रक:— 5 Aug पर्यंत प्रवेश अर्ज स्विकृती; 5aug MKCL जनरल यादी प्रसिद्ध करतील ,10 ते 15 Aug तक्रार अर्ज स्वीकृती ,16 Aug तक्रार निवारण ,22Aug गुणवत्तायादी प्रवेश मुलाखत पत्र व सूचना आणि शेड्यूलसह वेबवर प्रसिद्ध ,25 ते 31 Aug प्रवेश फेरी
बि.एड. प्रवेश प्रक्रियेसाठी शिक्षक मित्रांना शुभेच्छा!!!
🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹
शरद कुरूंदकर,सहशिक्षक,किनवट,जि.नांदेड
sharadkurundkar.blogspot.in whatsapp no. 8888477044
🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹
प्रॉस्पेक्ट व महत्वाचे फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा
माहिती पत्रक(PROSPECTUS)