शाळासिद्धि कार्यक्रम विशेष
शाळासिद्धी माहितीच्या पीडीएफ फाईल्स व शाळासिद्धी मराठी पुस्तिका पाहण्यासाठी व डाऊनलोड करण्यासाठीयेथे क्लिक करा
शैक्षणिक सत्र २०१८ - २०१९ साठी शाळासिद्धी अंतर्गत शाळांचे स्वयंमूल्यमापन ऑनलाइन करण्याबाबतच्या सूचना प्राप्त झालेल्या आहेत.
हा कार्यक्रम nuepa तर्फे राबविला जातो. संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या २४ डिसेंबर २०१८ रोजी च्या पत्रान्वये सत्र २०१८ - २०१९ साठी राज्यातील सर्व प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांनी आपले मूल्यांकन व प्रमाणीकीकरण करणे व शाळांची गुणवत्ता आश्वासित करणे गरजेचे आहे . तसेच शैक्षणिक , भौतिक व संस्थात्मक गुणवत्तावाढीच्या उद्देशाने राज्य शासनाने राष्ट्रीय पातळीवरील शालासिद्धी हा कार्यक्रम महाराष्ट्र राज्यामध्ये समृद्ध शाळा नावाने सुरू केलेला आहे . उपरोक्त शासन निर्देशानुसार प्रत्येक शाळेने दरवर्षी शाळांचे स्वयंमूल्यमापन करणे अपेक्षित आहे ._*
शैक्षणिक सत्र २०१८-२०१९ साठी ३० जानेवारी २०१९ पर्यंत शाळा सिद्धि चे स्वयंमूल्यमापन करणे गरजेचे आहे . त्यासाठी www.shaalasiddhi.nuepa.org या न्यूपा नवी दिल्लीच्या वेबपोर्टलवर आपल्या शाळेचे स्वयंमूल्यमापन करणे गरजेचे आहे .
आपल्या जिल्ह्याचे कार्य देशात सर्वोत्तम असावे यासाठी सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनी त्वरित लॉगिन होऊन उपरोक्त वेबपोर्टलवर आपले स्वयंमूल्यमापन त्वरित करावे व त्याची माहिती पंचायत समिती मध्ये मा. गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे द्यावी .
स्वयंमूल्यमापन ३० जानेवारी २०१९ पूर्वी करावे.
शाळा सिद्धि स्वयंमूल्यमापन करण्याची कार्यपद्धती*
माहितीचे प्रत्यक्ष खालील चार टप्पे आहेत
शाळेतील संपूर्ण विद्यार्थ्यांची माहिती.
शाळेतील संपूर्ण शिक्षकांची माहिती.
७ क्षेत्र म्हणजे 46 गाभा माणके
प्रत्येक गाभा मानकानुसार त्या त्या स्तरांमध्ये सुधारणेचे नियोजन.
माहिती भरण्यापूर्वी काही महत्त्वपूर्ण बाबी लक्षात घ्याव्या*
जातवार पटसंख्या- ३० सप्टेंबर २०१८ ची अपेक्षित आहे.
वार्षिक उपस्थिती सत्र २०१७ - २०१८ ची अपेक्षित आहे.
मुख्य विषय संपादणुक - इयत्ता आठवी ते बारावीची मागील ( २०१७ - २०१८ )शैक्षणिक वर्षाची लिहावी_
सत्र २०१७-२०१८ चा निकाल- इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या निकाल टक्केवारीत लिहावा.
शिक्षक संख्या - ३० सप्टेंबर २०१८ नुसार किंवा प्रत्यक्ष वाढलेली असल्यास ती नोंदवावी.
शिक्षकांच्या रजा- _१ जानेवारी २०१८ ते ३१ डिसेंबर २०१८ - या कालावधीत रजा घेतलेल्या शिक्षकांची संख्या लिहित असतांना ते सलग एक आठवडा , एक महिना किंवा त्यापेक्षा जास्त रजेवर असतील तोच कालावधी गृहीत धरावा._
स्तर निश्चिती- _पुस्तिकेमध्ये दिल्याप्रमाणे आपण कुठल्या स्तरांमध्ये आहोत याची खात्री करूनच सुयोग्य स्तर निश्चित करावा_
सुधारणेचे नियोजन - _गाभा मानकाचा अध्ययन स्तर तीन पेक्षा कमी असेल तर त्यासाठी आपण काय सुधारणा करणार आहोत याचे नियोजन आपण स्वतःसाठी करणे गरजेचे आहे. ते ॲक्शन प्लॅन मध्ये लिहावे.
प्रत्येक शाळेचे आपले घोषवाक्य निश्चित कलेले असावे. ते प्रत्येक वेळी बदलू नये* 🌹
स्तर एकला १ गुण , स्तर दोनला २ गुण , स्तर तीनला ३ गुण अशाप्रकारे सातही क्षेत्राचे संकलन करून गुण ठरवावे*
महत्वाचे :- पहिल्या क्षेत्रामध्ये मध्ये दोन भाग असुन पहील्या भागात उपलब्धता व पर्याप्तता हा भाग आहे . दुसरा भाग उपयुक्तता व गुणवत्ता यामध्येच प्राप्त असलेल्या स्तरांना गुणदान केले आहे._
_स्वयंमूल्यमापन ऑनलाईन केल्यानंतर आपल्या लाॉगिनमधुन *रिपोर्ट* या टॅब मधे जावून प्रिंट काढावी._
*श्रेणी आपण खालील प्रमाणे काढावी.*
*श्रेणी "अ" :- ११२ ते १३८ गुण*
*श्रेणी "ब" :- ६९ ते १११ गुण*
*श्रेणी "क" :- _६८ किंवा पेक्षा कमी गुण_*
*शाळासिध्दी स्वयंमूल्यमापन /OTP व पासवर्ड बाबत.*
शाळा स्वयंमूल्यमापन सन 2018/2019 करीता सर्व शाळांना आपली माहीती शाळासिध्दी वेबपोर्टलवर भरण्यासाठी कळविण्यात आलेले आहे. स्वयंमूल्यमापन व OTP पासवर्ड बाबत....महत्वाचे
1)www.shaalasiddhi.nuipa.org या वेबपोर्टलवर माहीती असलेल्या माहीती पुस्तिका व वर्णन विधानांचे काळजीपूर्वक वाचन करावे.
2) पुस्तिकेतील डॅशबोर्डनुसार शाळेची माहीती तयार करुन ठेवावी.
3) सर्व माहीती तयार झाल्यावर लाॅगीन करावे व सन 2018/2019 या रकाण्यात माहीती भरावी. शेवटी submit बटन दाबावे. सबमिट झालेली माहीती प्रिंट काढावी. प्रिंट तपासावी. माहीती पुर्णपणे बरोबर असल्यास final submit करावी.
4) OTP बाबत....
सन 2016/17 मध्ये शाळासिध्दी माहीती भरण्याआधी शाळांना आपली पायाभूत माहीती देणे आवश्यक होते. यामध्ये युडायस नंबर, मुख्याध्यापक नाव , मोबाईल नंबर, शाळेचा ईमेल ही माहीती होतो. ती दिल्यानंतर शाळेला OTP नंबर दिलेल्या मेलवर व मोबाईल वर प्राप्त झालेला आहे. *हा OTP शाळेला कायम स्वरुपी जतन करुन ठेवायचा आहे.* आपला पासवर्ड विसरल्यास व आपण Forget password बटन दाबल्यास तोच OTP मेल व मोबाईल वर पुन्हा पुन्हा येतो.
1) मुख्याध्यापक बदलले असल्यास आपण त्याच्याकडून पासवर्ड घ्यावा.
2) OTP घ्यावा.
3) आठवत नसल्यास Forget pasaword option वापरुन त्यांच्या मोबाईलवरुन प्राप्त करुन घ्यावा.
4) शाळेच्या मेलवर पण प्राप्त होतो
(कारण एकाच वेळी मोबाईल व मेलवर पाठविला जातो.)
4) मेल व मोबाईल दोन्हीही बदलल्यास व माहीती नसल्यास आपणास सदर OTP प्राप्त करण्यासाठी NUIPA नवीदिल्लीच्या मेलवर कींवा शाळासिध्द कक्ष येथे माहीती पाठवावी लागते. पण सदर माहीती ही प्रमाणीत असणे आवश्यक आहे. मुख्याध्यापक पत्र असणे आवश्यक असते.
5) सध्या शाळासिध्दी कक्षाच्या मेलवर OTP साठी मोठ्या प्रमाणात मेसेज येत आहेत. मेसेज मधील माहीती अपूर्ण असल्यास व प्रमाणीत केलेली नसल्यास OTP पाठविता येत नाही.
6) लवकरच NIEPA नवीदिल्ली यांचे कडून जिल्हा व तालुका लाॅगिन प्रमाणित करुन मिळणार आहे. त्यामुळे ज्या शाळांना OTP/ पासवर्ड/ मोबाईल/मेल या चार पैकी काहीच माहीती नाही त्यांनी तालुका व जिल्हास्तरावरुन OTP प्राप्त करुन घ्यावा.
*संपर्क अधिकारी,*
*शाळासिध्दी कक्ष.*