य.च.म.मु.वि. बि.एड. २०१९-२१
य.च.म.मु.वि. नाशिक तर्फे २०१९-२१ या कालावधी दरम्यान राबविल्या जाणाऱ्या बी.एड. अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आलेली असून १ ऑगस्ट ते १६ ऑगस्ट अशी अर्ज दाखल करण्याची मुदत देण्यात आलेली आहे.माहितीपत्रक डाउनलोड करण्यासाठी खालील clik here येथे क्लिक करा.
मित्रांनो य.च.म.मु.विद्यापीठाची बि.एड. प्रवेश प्रक्रिया दिनांक 1 ऑगस्पाट 2019 सून सुरू झाली असून ही प्रक्रिया संपूर्णपणे अॉनलाईन असून गुंतागुंतीची असल्यामुळे प्रक्रिया नीट समजून घेऊन प्रवेशासाठी नोंदणी व अॉनलाईन प्रवेश अर्ज भरणे या बाबी कराव्यात.आपण अर्ज भरताना काहि चूक झाल्यास अथवा अपूर्ण वा चुकीची माहिती भरली गेल्यास प्रवेश प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर आपणांस बाद केले जाऊ शकते .प्रवेश अर्ज भरताना खालील प्रक्रियेचा अवलंब करावा.हा अर्ज आपणांस स्वत: किंवा MKCL च्या अधिकृत केंद्रावरुन भरता येईल. *online* बसण्यापूर्वी पुढील माहिती/कागदपत्रे आपल्या जवळ असल्याची खात्री करुन घ्या 👉जन्म तारखेचे प्रमाणपत्र (नसल्यास 10 वी सनद)☄☄आपणांस राखीव प्रवर्गातून फॉर्म भरावयाचा असल्यास जातीचे प्रमाणपत्र(जातवैधता प्रमाणपत्र सुद्धा आवश्यक असून आपली निवड झाल्यास प्रवेशावेळी तपासून घ्यावे लागेल.) ☄ तसेच *sc*व *st* वगळता इतर सर्व वर्गांसाठी ,सध्या वैध असलेले नॉनक्रिमीलेयर प्रमाणपत्र ☄ .☄फॉर्म भरायला सुरुवात करण्यापूर्वी आपला फोटो आणि सहीचा नमूना स्कॅन करून ठेवावा.(width-3.375 inch/height -2.125 inch/ resolution-72 pixel/file size-max 30kb/format-any) ☄ कागदपत्रे *jpg,jpeg,png,bmp,zip,rar,pdf* फॉर्मेट मध्ये स्कॅन केलेली चालतील परंतू फाईल साईझ 150kb पेक्षा अधिक असू नये.एका पेक्षा अधिक पेजेस अपलोड करावयाची असल्यास , .
ही सर्व पूर्व तयारी झाल्यानंतरच फॉर्म भरायला सुरुवात करा.
💥1) सर्वप्रथम www.ycmou.digitaluniversity.ac या वेबसाईट वर जा.
💥2) दर्शनी पृष्ठावर बि.एड प्रवेश 2019-21 दिसेल त्यावर क्लिक करा.
💥3) या पेज वर सर्वात वर Register online हे बटण दिसेल त्यावर क्लिक करा. या पेज वर विद्यापीठाचे नियम व अटी असून त्या नीट वाचून त्याखाली असलेल्या *Accept* या बटणवर क्लिक करा
💥3) या पेज वर आपणास आपली बिएड. प्रवेशासाठीची पात्रता तपासून पाहावयाची आहे,त्यासाठी चार प्रश्न विचारलेले असून चारही प्रश्नांचे आपले उत्तर *Yes* असेल तर खाली असलेल्या *Proceed*या बटणवर क्लिक करा.(दूरस्थ /पत्रद्वारा डि.एड. केलेले शिक्षक प्रवेशासाठी अपात्र आहेत)💥4) या पेज वर ,आपण जर 2008 नंतर ycmou विद्यापीठात कोणताही अभ्यासक्रम पूर्ण केलेला असेल व आपणाकडे 16 अंकी PRN असल्यास *Yes* ,नसेल तर *No* सलेक्ट करा.आपण जर *Yes*सलेक्ट केले तर लगेच त्याखाली नवीन विंडो ओपन होईल त्यात आपला 16 अंकी PRN भरा व खाली असलेल्या *Save & proceed*या बटणवर क्लिक करा.आपल्याकडे 16 अंकी PRN असल्यास पुढच्या पेज वर बरीच माहिती आधीच भरलेली दिसेल शिवाय आपली सही व फोटो स्कॅन केलेला दिसेल त्यात काही बदल करावयाचा नसल्यास तसाच ठेवून *Save & proceed* वर क्लिक करा .
💥5) यानंतरच्या पेज वर आपणांस आपले नाव ,जन्मदिनांक ,पत्ता व इतर माहिती भरावयाची आहे .येथे महत्वाचे म्हणजे अभ्यासकेंद्राचा जिल्हा सलेक्ट करतांना आपली शाळा ज्या जिल्ह्यात आहे तोच जिल्हा सलेक्ट करा समोर संकेतांक आपोआपच येईल.त्याखाली आपला पत्ता लिहून पत्याशी संबंधित इतर माहिती भरा. मोबाईल क्रमांक लिहा व असल्यास ई मेल आयडी. भरा.व त्याखाली असलेल्या *Save & Proceed* या बटणवर क्लिक करा.लगेच आपण लिहिलेल्या मोबाईल वर एकवेळ वापरावयाचा पासवर्ड येईल.
💥6) या पेज वर ,आपल्या मोबाईल वर आलेला एकवेळ वापरावयाचा पासवर्ड भरा.त्याखाली असलेल्या *Verify OTP* या बटणवर क्लिक करा.
💥7) या पेज वर आपणांस आपला संपूर्ण प्रक्रियेमध्ये वापरावयाचा *Login ID* व *Password* दिसेल तो लिहून घ्या ,मोबाईलने फोटो काढा अथवा प्रिंट काढा.प्रिंट काढणेच सोईस्कर होईल. खाली असलेल्या *Save &Proceed to fill application form* या बटणवर क्लिक करा.
💥8) या पेजवर वर मार्गदर्शक सूचना दिसतील.डाव्या बाजूला असलेल्या *Fill/Edit Application form या लिंक वर क्लिक करा व वरील मार्गदर्शक सूचनांनूसार फॉर्म भरायला सुरुवात करा.संपूर्ण फॉर्म भरल्यानंतर जनरेट होणारे ई चलन विद्यापीठाने नियुक्त केलेल्या बँकेत भरा. बँकेने तुमच्या चलनावर ट्रँझॅक्शन नंबर टाकला आहे याची खात्री करुन घ्या.प्रोसेसिंग शुल्क खुल्या प्रवर्गासाठी 400₹ तर राखीव प्रवर्गांसाठी 200₹ भरावयाचे आहेत. किंवा Netbanking द्वारे देखील फीस भरण्याचा पर्याय उपलब्ध आहे .
💥9) आता परत एकदा आपल्याला अॉनलाईन जाऊन क्र.1 व 2 मधील सूचनेनूसार बि.एड. प्रवेश प्रक्रियेचे पेज ओपन करावे लागेल व पूर्वीच आपल्याकडे असलेल्या *Login ID व पासवर्डने* आपला फॉर्म ओपन करुन *pay application Fee* यात आपल्या ई चलनावरील ट्रँझॅक्शन नंबर भरुन आपला फॉर्म अॉथेंटीक करावा लागेल.
या सर्व पाय-या यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर आपल्याला आपला प्रवेश अर्ज भरला गेल्याचा मेसेज
येईल,ज्या विद्यार्थ्यांना असा मेसेज येईल तेवढेच अर्ज
प्रवेशासाठी विचाराधीन ग्राह्य धरले जातात असे माहिती पत्रकात सांगितलेले आहे , परंतु Netbanking द्वारे फीस भरल्यास असा मेसेज येत नसल्याचे बर्याच जणांनी कळविले आहे ,.
यानंतरही गुणवत्ता यादीत आलेल्या उमेदवारांना मुलाखतीसंदर्भातील माहिती केवळ विद्यापीठाच्या वेबसाईटवरच कळविली जाते, तसेच गुणवत्ता
यादीसुद्धा वेबसाईटवरच प्रसिद्ध केली जाते.त्यामूळे
वेळोवेळी वेबसाईट ला भेट देणे ही उमेदवारांची
जबाबदारी आहे.
निवड प्रक्रिया/गुण देण्याची पद्धत -
1] अनुभवाच्या प्रत्येक वर्षासाठी 1गुण ,वरच्या 6 महिन्यापर्यंत 0 व 6
महिन्यांपेक्षा जास्त सेवेला एक गुण. +
2] पदवीच्या श्रेणीला पुढीलप्रमाणे गुण O-6/A-5/B-4/C-0 +
3] पदव्युत्तर श्रेणीला पुढील प्रकारे गुण A किंवा O-5/B-4/C-3 +
4] डि.एस.एम. अथवा समकक्ष श्रेणीला पुढील प्रकारे गुण A किंवा O-5/B-4/C-3 +
5] पदवीधर वेतनश्रेणी मिळालेली असल्यास वेतनश्रेणी मिळाल्यानंतरच्या प्रत्येक वर्षासाठी एक अतिरिक्त गुण मिळतो,परंतु पाच वर्षात बी.एड. करणे आवश्यक असल्याचे नियोक्त्याचे प्रमाणपत्र आपल्याकडे असणे आवश्यक आहे .
वरीलप्रमाणे गुणदान केल्यानंतर अंतिम गुणवत्ता यादीत समान गुण असतील तर प्रथम अनुभवाचा आणि नंतर वयानूसार ज्येष्ठतेचा विचार केला जातो जर वय देखील समान असेल तर पदवी उत्तिर्णतेची ज्येष्ठता विचारात घेत
ली जाते.
वेळापत्रक:— online अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिनांक 16 ऑगस्ट हा आहे.
बि.एड. प्रवेश प्रक्रियेसाठी शिक्षक मित्रांना शुभेच्छा!!!
🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹
शरद कुरूंदकर,सहशिक्षक,किनवट,जि.नांदेड
sharadkurundkar.blogspot.com