"मी शरद कुरुंद्कर,पदवीधर शिक्षक (विज्ञान/गणित) जि.प.कें.प्राथमिक शाळा कमठाला ,ता. किनवट ,जि. नांदेड "ज्ञानसाधना" या ब्लॉग ला भेट देणारांचे सहर्ष स्वागत करीत आहे....!"

Wednesday, 4 September 2019

Diksha App चा वापर कसा करावा?

⛳ 📲🖥 *DIKSHA अँप मध्ये रजिस्ट्रेशन कसे करावे?* ⛳🖱🖥

📫📫📫📫📫📫📫

*राज्यातील सर्व शिक्षकांना दीक्षा अॅप मध्ये रजिस्ट्रेशन करुन Teacher user व्हायचे आहे. त्यासाठी खालील तीन सोप्या स्टेप्स वापरून मध्ये रजिस्टर व्हा !*
 ⚜  *सर्वप्रथम playstore लिंकवरून अॅप डाऊनलोड करून घ्या व install करा .सुरूवातीला अॅप ज्या permissions मागेल त्या सर्व Allow करा. Teacher/student यापैकी Teacher निवडा त्यानंतर योग्य तो Board, class, subject इ. निवडा.*
➡ *~स्क्रिन क्र.1~ दिसेल त्यात सर्वात खाली Signin वर क्लिक करा. त्यानंतर*
 ➡ *~स्क्रिन क्र.2~ दिसेल त्यात सर्वात खाली Signup वर क्लिक करा.त्यानंतर*
 ➡ *~स्क्रिन क्र.3~ दिसेल त्यात पूर्ण नाव मोबाईल क्रमांक लिहिल्यानंतर त्याखाली पासवर्ड तयार करा हा तुमचा अॅप साठीचा पासवर्ड असेल.पासवर्ड हा कमीतकमी आठ अंकी व अंक आणि अक्षरे मिळून तयार झालेला असावा. त्याखाली परत तोच पासवर्ड लिहा व Signup वर क्लिक करा. तुमचा मोबाईल क्रमांक हा ID व तुम्ही तयार केलेला पासवर्ड वापरून अॅप मध्ये Signin व्हा. Diksha अॅप मध्ये unlimited Access मिळविण्यासाठी Signin करणे आवश्यक आहे तेव्हा आजच Signup आणि Signin या स्टेप्स पूर्ण करा व अॅप वापरायला सुरूवात करा.*

🎯 *दीक्षा अॅप चा वापर का व कशासाठी तसेच भविष्यातील योजना*  🎯

 🔆 *Diksha अॅप चा मुख्य उद्देश्य आपल्यापैकीच काही तंत्रस्नेही शिक्षकांनीच  निर्मिती केलेले ई-साहित्य आपणास वर्गाध्यापनासाठी मोफत उपलब्ध करून देणे हा जरी असला तरी अॅपमूळे आपण National platform शी जोडले जाणार आहोत व भविष्यात शिक्षकांच्या व्यावसायिक विकासासाठी विविध प्रमाणपत्र कार्यक्रम, शिक्षकांसाठी विविध कार्यशाळा तसेच शिक्षकांचे नवनवीन उपक्रम देशातील सर्व शिक्षकांपर्यंत पोहोचविणे  असे विविध कार्यक्रम ~Diksha~  अॅपच्या माध्यमातून राबविले जाणार आहेत. त्यामुळे आपण आपण अॅपमध्ये Signin होणे आवश्यक आहे. सध्या अॅपचा वापर आपणास आपली इयत्ता, विषय,घटक यानूसार शिक्षकनिर्मित ई-साहित्य विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी करायचा आहे. हे ई-साहीत्य पुढीलप्रकारे उपलब्ध करून घेता येईल. 1) पाठ्यपुस्तकात संबंधित पाठाच्या खाली दिलेला QR कोड स्कॅन करून 2) बोर्ड, इयत्ता,विषय, घटक अशाप्रकारे अॅपमध्ये सर्च करून.*

*शाळेमध्ये network नसल्यामूळे इंटरनेटशी जोडले जाऊ शकत नाही अशावेळी काय करावे?- अशा परिस्थितीत आपल्या घरी किंवा इतर जेथे इंटरनेट उपलब्ध होईल अशा ठिकाणी वरील पैकी एक पद्धत वापरून ई-साहित्य डाऊनलोड करून घ्यावे एकदा ई-साहित्य अॅप मध्ये डाऊनलोड झाल्यानंतर  कधीही त्याचा वापर वर्गाध्यापनात करता येईल.*

💎💎💎💎💎💎💎
*_Dikshaअॅप डाऊनलोड लिंक_*
👇👇👇👇👇👇👇

https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.diksha.app