"मी शरद कुरुंद्कर,पदवीधर शिक्षक (विज्ञान/गणित) जि.प.कें.प्राथमिक शाळा कमठाला ,ता. किनवट ,जि. नांदेड "ज्ञानसाधना" या ब्लॉग ला भेट देणारांचे सहर्ष स्वागत करीत आहे....!"

Monday, 23 December 2019

अॉनलाईन पदवीधर मतदार नोंदणी

📢 *अॉनलाईन पदवीधर मतदार नोंदणी* 📢

_आपली पदवीधर मतदार म्हणून नोंदणी झाली नसल्यास खालील लिंकवरून करू शकता.अपलोड करावयाची कागदपत्रे 1) पासपोर्ट फोटो 2) फोटो आय.डी. 3) पदवी प्रमाणपत्र/शेवटच्या वर्षाचे गुणपत्रक 4) नावात बदल असल्यास प्रमाणपत्र/ विवाह नोंदणी प्रमाणपत्र._

👇👇👇👇👇👇👇

येथे क्लिक करा

➖▪➖▪➖▪➖

www.sharadkurundkar.blogspot.com

➖▪➖▪➖▪➖

Monday, 23 September 2019

शाळेच्या स्टुडंट पोर्टलमध्ये शिक्षकांची नावे समाविष्ट करणे

🌈🌎 *शाळेच्या student पोर्टल मध्ये सध्या शाळेत असलेल्या शिक्षकांची नावे समाविष्ट करण्याची तसेच ते शिकवित असलेल्या वर्गांना वर्गशिक्षक/विषयशिक्षक म्हणून Assign होण्याची प्रक्रिया./शिक्षकांची नावे पूर्वी कोणत्याही शाळेच्या student portal मध्ये समाविष्ट व वर्गांना Assign नसल्यास सध्याच्या शाळेत करण्याची प्रक्रिया.*  🌈🌎

🖱🖨⌨💻🖱🖨⌨

〰〰〰〰〰〰〰-sharadkurundkar.blogspot.com    👈

"ज्ञानसाधना या शैक्षणिक ब्लाॅगवर संग्रहित
〰〰〰〰〰〰〰

➡ *_Attach/Detach प्रोसेस द्वारा आपण नविन शाळेच्या staff portal ला attach झालो तरीही स्टुडंट पोर्टलला मात्र स्वतंत्र प्रक्रियेद्वारे नविन शाळेच्या student पोर्टल मध्ये आपल्याला शिक्षक वापरकर्ता म्हणून create व वर्ग/विषय शिक्षक म्हणून आपण शिकवित असलेल्या वर्गांना assign व्हायचे आहे.त्यासाठी आपल्याला जुन्या व नविन अशा दोन्ही शाळांच्या student पोर्टलमध्ये पुढीलप्रमाणे प्रक्रिया करावी लागेल:(सध्या शाळेत कार्यरत शिक्षकांची नावे यापूर्वी कोणत्याही शाळेच्या स्टुडंट पोर्टलमध्ये create teacher user मध्ये समाविष्ट व कोणत्याही वर्गांना assign नसल्यास फक्त नवीन शाळेच्या student portal मध्ये खालील क्र.२ची प्रक्रिया करावी.)_*

👇
🎯 *(1) जुन्या शाळेच्या स्टुडंट पोर्टलमध्ये करावयाची प्रक्रिया:*

 i) आपल्या जुन्या शाळेत आपल्याला वर्गांना/विषयांना asign केलेले असते. सुरूवातीला maintainance>assign class teacher मधून आपल्या नावावर क्लिक करून remove व्हावे.
ii) त्यानंतर master>create teacher user मधून आपल्या नावावर क्लिक करून डिलीट व्हावे.

*या दोन प्रक्रिया जुन्या शाळेच्या स्टुडंट पोर्टल मध्ये पूर्ण केल्या शिवाय सिस्टिम आपल्याला नविन शाळेच्या स्टुडंड पोर्टल मध्ये add  अथवा asign होण्यास परवानगी देणार नाही.

🎯 *(2)नविन शाळेच्या student portal मध्ये करावयाची प्रक्रिया:* 👇

i) नविन शाळेच्या student portal ला लॉगिन करून master >create teacher user मधून आपले नाव समाविष्ट करण्यासाठी नाव/शालार्थ आय.डी./मो. क्र. ही माहिती भरून Register वर क्लिक करावे.
ii) त्यानंतर maintainance>assign class teacher मधून आपण नविन शाळेत शिकवित असलेला वर्ग/विषय /शिक्षकाचे नाव निवडून संबंधित वर्गांना वर्गशिक्षक/विषय शिक्षक म्हणून assign व्हावे लागेल.
〰〰〰〰〰〰〰-sharadkurundkar.blogspot.com   👈

"ज्ञानसाधना या शैक्षणिक ब्लाॅगवर संग्रहित."
〰〰〰〰〰〰〰

Wednesday, 11 September 2019

इ.५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रु. 2020

💎 *इ. 5वी व 8वी शिष्यवृत्ती परिक्षा फेब्रु. -2020अॉनलाईन आवेदनपत्र भरण्याबाबतचे वेळापत्रक व फीसबाबत-* 💎

〰〰〰〰〰〰〰
www.sharadkurundkar.blogspot.com

▪▪▪▪▪▪▪

➡ _नियमित शुल्कासह- *दि.1/10/2019 ते 15/11/2019*_

➡ _विलंब शुल्कासह-दि. *16/11/2019 ते 30/11/2019*_

*अतिविलंब शुल्कासह- दि.1/12/2019ते 15/12/2019*

*अतिविशेष विलंब शुल्कासह -दि. 16/12/2019 ते 31/12/2019*


⏭ *प्रवेशशुल्क नियमित-20₹*

*परीक्षाशुल्क नियमित-60₹*
*विलंब शुल्क-50₹*

*अतिविलंबशुल्क -10₹ प्रतिदिन*

*अतिविशेष  विलंबशुल्क-20₹*
*प्रतिदिन*


➡  *sc ,st,vj-a, nt-b/c/d तसेच दिव्यांग*
*विद्यार्थ्यांना परिक्षा शुल्क नाही.*
ही सवलत फक्त महाराष्ट्र शासनाचा अभ्यासक्रम राबविणार्या शाळांकरिताच लागू आहे.

➡ *sbc,obc,open विद्यार्थ्यांना परीक्षाशुल्क भरावे लागेल*

➡ *_वयोमर्यादा-_*
*इ.5वीसाठी 11वर्षे*
*इ.8वी साठी 14वर्षे*


⏭ *परीक्षेची आवेदनपत्रे या वेबसाईटवरून भरावयाची आहेत* 👉

www.mscepune.in

http://puppss.mscescholarshipexams.in

〰〰〰〰〰〰〰
"ज्ञानसाधना" या शैक्षणिक ब्लॉगवर संग्रहित:
www.sharadkurundkar.blogspot.com

▪▪▪▪▪▪▪

Wednesday, 4 September 2019

Diksha App चा वापर कसा करावा?

⛳ 📲🖥 *DIKSHA अँप मध्ये रजिस्ट्रेशन कसे करावे?* ⛳🖱🖥

📫📫📫📫📫📫📫

*राज्यातील सर्व शिक्षकांना दीक्षा अॅप मध्ये रजिस्ट्रेशन करुन Teacher user व्हायचे आहे. त्यासाठी खालील तीन सोप्या स्टेप्स वापरून मध्ये रजिस्टर व्हा !*
 ⚜  *सर्वप्रथम playstore लिंकवरून अॅप डाऊनलोड करून घ्या व install करा .सुरूवातीला अॅप ज्या permissions मागेल त्या सर्व Allow करा. Teacher/student यापैकी Teacher निवडा त्यानंतर योग्य तो Board, class, subject इ. निवडा.*
➡ *~स्क्रिन क्र.1~ दिसेल त्यात सर्वात खाली Signin वर क्लिक करा. त्यानंतर*
 ➡ *~स्क्रिन क्र.2~ दिसेल त्यात सर्वात खाली Signup वर क्लिक करा.त्यानंतर*
 ➡ *~स्क्रिन क्र.3~ दिसेल त्यात पूर्ण नाव मोबाईल क्रमांक लिहिल्यानंतर त्याखाली पासवर्ड तयार करा हा तुमचा अॅप साठीचा पासवर्ड असेल.पासवर्ड हा कमीतकमी आठ अंकी व अंक आणि अक्षरे मिळून तयार झालेला असावा. त्याखाली परत तोच पासवर्ड लिहा व Signup वर क्लिक करा. तुमचा मोबाईल क्रमांक हा ID व तुम्ही तयार केलेला पासवर्ड वापरून अॅप मध्ये Signin व्हा. Diksha अॅप मध्ये unlimited Access मिळविण्यासाठी Signin करणे आवश्यक आहे तेव्हा आजच Signup आणि Signin या स्टेप्स पूर्ण करा व अॅप वापरायला सुरूवात करा.*

🎯 *दीक्षा अॅप चा वापर का व कशासाठी तसेच भविष्यातील योजना*  🎯

 🔆 *Diksha अॅप चा मुख्य उद्देश्य आपल्यापैकीच काही तंत्रस्नेही शिक्षकांनीच  निर्मिती केलेले ई-साहित्य आपणास वर्गाध्यापनासाठी मोफत उपलब्ध करून देणे हा जरी असला तरी अॅपमूळे आपण National platform शी जोडले जाणार आहोत व भविष्यात शिक्षकांच्या व्यावसायिक विकासासाठी विविध प्रमाणपत्र कार्यक्रम, शिक्षकांसाठी विविध कार्यशाळा तसेच शिक्षकांचे नवनवीन उपक्रम देशातील सर्व शिक्षकांपर्यंत पोहोचविणे  असे विविध कार्यक्रम ~Diksha~  अॅपच्या माध्यमातून राबविले जाणार आहेत. त्यामुळे आपण आपण अॅपमध्ये Signin होणे आवश्यक आहे. सध्या अॅपचा वापर आपणास आपली इयत्ता, विषय,घटक यानूसार शिक्षकनिर्मित ई-साहित्य विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी करायचा आहे. हे ई-साहीत्य पुढीलप्रकारे उपलब्ध करून घेता येईल. 1) पाठ्यपुस्तकात संबंधित पाठाच्या खाली दिलेला QR कोड स्कॅन करून 2) बोर्ड, इयत्ता,विषय, घटक अशाप्रकारे अॅपमध्ये सर्च करून.*

*शाळेमध्ये network नसल्यामूळे इंटरनेटशी जोडले जाऊ शकत नाही अशावेळी काय करावे?- अशा परिस्थितीत आपल्या घरी किंवा इतर जेथे इंटरनेट उपलब्ध होईल अशा ठिकाणी वरील पैकी एक पद्धत वापरून ई-साहित्य डाऊनलोड करून घ्यावे एकदा ई-साहित्य अॅप मध्ये डाऊनलोड झाल्यानंतर  कधीही त्याचा वापर वर्गाध्यापनात करता येईल.*

💎💎💎💎💎💎💎
*_Dikshaअॅप डाऊनलोड लिंक_*
👇👇👇👇👇👇👇

https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.diksha.app

Tuesday, 3 September 2019

मतदार यादीत आपले नाव व क्रमांक शोधा

आपले मतदार यादीतील नाव कुठल्या क्रमाकाला आहे हे माहीत नसते, खाली लिंक वर नुसती टिचकी मारा,आपले नाव टाका,तुमचे नाव,यादी भाग क्रमांक,व क्रमांक येईल,edc फॉर्म भरा,आपला हक्क बजावा ,

https://bit.ly/2QGMWSx

सर्व अधिकारी/कर्मचारी तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना उपयोगी ही लिंक आहे....🌹🌹🌹

Saturday, 3 August 2019

य.च.म.मु.वि. बि.एड. २०१९-२१

                    य.च.म.मु.वि.  बि.एड. २०१९-२१ 




 य.च.म.मु.वि. नाशिक तर्फे २०१९-२१ या कालावधी दरम्यान राबविल्या जाणाऱ्या बी.एड. अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आलेली असून १ ऑगस्ट ते १६ ऑगस्ट अशी अर्ज दाखल करण्याची मुदत देण्यात आलेली आहे.माहितीपत्रक डाउनलोड करण्यासाठी  खालील clik here येथे क्लिक करा.


                                                                                





         CLIK HERE 







          अर्ज कसा दाखल करावा ?

           
 मित्रांनो य.च.म.मु.विद्यापीठाची बि.एड. प्रवेश प्रक्रिया दिनांक 1 ऑगस्पाट 2019 सून सुरू झाली असून ही प्रक्रिया संपूर्णपणे अॉनलाईन असून गुंतागुंतीची असल्यामुळे प्रक्रिया नीट समजून घेऊन प्रवेशासाठी नोंदणी व अॉनलाईन प्रवेश अर्ज भरणे या बाबी कराव्यात.आपण अर्ज भरताना काहि चूक झाल्यास अथवा अपूर्ण वा चुकीची माहिती भरली गेल्यास प्रवेश प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर आपणांस बाद केले जाऊ शकते .प्रवेश अर्ज भरताना खालील प्रक्रियेचा अवलंब करावा.हा अर्ज आपणांस स्वत: किंवा MKCL च्या अधिकृत केंद्रावरुन भरता येईल. *online* बसण्यापूर्वी पुढील माहिती/कागदपत्रे आपल्या जवळ असल्याची खात्री करुन घ्या  👉जन्म तारखेचे प्रमाणपत्र (नसल्यास 10 वी सनद)☄☄आपणांस राखीव प्रवर्गातून फॉर्म भरावयाचा असल्यास जातीचे प्रमाणपत्र(जातवैधता प्रमाणपत्र सुद्धा आवश्यक असून आपली निवड झाल्यास प्रवेशावेळी तपासून घ्यावे लागेल.) ☄ तसेच *sc*व *st* वगळता इतर सर्व वर्गांसाठी ,सध्या वैध असलेले नॉनक्रिमीलेयर प्रमाणपत्र  .☄फॉर्म  भरायला सुरुवात करण्यापूर्वी आपला  फोटो आणि सहीचा नमूना स्कॅन करून ठेवावा.(width-3.375  inch/height -2.125 inch/ resolution-72 pixel/file size-max 30kb/format-any)  कागदपत्रे *jpg,jpeg,png,bmp,zip,rar,pdf* फॉर्मेट मध्ये स्कॅन केलेली चालतील परंतू फाईल साईझ 150kb पेक्षा अधिक असू नये.एका पेक्षा अधिक पेजेस अपलोड करावयाची असल्यास , .
ही सर्व पूर्व तयारी झाल्यानंतरच फॉर्म भरायला सुरुवात करा.
💥1) सर्वप्रथम www.ycmou.digitaluniversity.ac या वेबसाईट वर जा.
💥2) दर्शनी पृष्ठावर बि.एड प्रवेश 2019-21 दिसेल त्यावर क्लिक करा.
💥3) या पेज वर सर्वात वर  Register online हे बटण दिसेल त्यावर क्लिक करा. या पेज वर विद्यापीठाचे नियम व अटी असून त्या नीट वाचून त्याखाली असलेल्या *Accept* या बटणवर क्लिक करा
💥3)  या पेज वर आपणास आपली बिएड. प्रवेशासाठीची पात्रता तपासून पाहावयाची आहे,त्यासाठी चार प्रश्न विचारलेले असून चारही प्रश्नांचे आपले उत्तर *Yes* असेल तर खाली असलेल्या *Proceed*या बटणवर क्लिक करा.(दूरस्थ /पत्रद्वारा डि.एड. केलेले शिक्षक प्रवेशासाठी अपात्र आहेत)
💥4) या पेज वर ,आपण जर 2008 नंतर ycmou विद्यापीठात कोणताही अभ्यासक्रम पूर्ण केलेला असेल व आपणाकडे 16 अंकी PRN असल्यास *Yes* ,नसेल तर *No* सलेक्ट करा.आपण जर *Yes*सलेक्ट केले तर  लगेच त्याखाली नवीन विंडो ओपन होईल त्यात आपला 16 अंकी PRN भरा व खाली असलेल्या *Save & proceed*या बटणवर क्लिक करा.आपल्याकडे 16 अंकी  PRN असल्यास पुढच्या पेज वर बरीच माहिती आधीच भरलेली दिसेल शिवाय आपली सही व फोटो स्कॅन केलेला दिसेल त्यात काही बदल करावयाचा नसल्यास तसाच ठेवून *Save & proceed* वर क्लिक करा .

💥5) यानंतरच्या  पेज वर आपणांस आपले नाव ,जन्मदिनांक ,पत्ता व इतर माहिती भरावयाची आहे .येथे महत्वाचे म्हणजे अभ्यासकेंद्राचा जिल्हा सलेक्ट करतांना आपली शाळा ज्या जिल्ह्यात आहे तोच जिल्हा सलेक्ट करा समोर संकेतांक आपोआपच येईल.त्याखाली आपला पत्ता लिहून पत्याशी संबंधित इतर माहिती भरा. मोबाईल क्रमांक लिहा व असल्यास ई मेल आयडी. भरा.व त्याखाली असलेल्या *Save & Proceed* या बटणवर क्लिक करा.लगेच आपण लिहिलेल्या मोबाईल वर एकवेळ वापरावयाचा पासवर्ड येईल.
💥6) या पेज वर ,आपल्या मोबाईल वर आलेला एकवेळ वापरावयाचा पासवर्ड भरा.त्याखाली असलेल्या *Verify OTP* या बटणवर क्लिक करा.
💥7) या पेज वर आपणांस आपला संपूर्ण प्रक्रियेमध्ये वापरावयाचा *Login ID* व *Password* दिसेल तो लिहून घ्या ,मोबाईलने फोटो काढा अथवा प्रिंट काढा.प्रिंट काढणेच सोईस्कर होईल. खाली असलेल्या *Save &Proceed to fill application form* या बटणवर क्लिक करा.
💥8) या पेजवर वर मार्गदर्शक सूचना दिसतील.डाव्या बाजूला असलेल्या *Fill/Edit Application form या लिंक वर क्लिक करा व वरील मार्गदर्शक सूचनांनूसार फॉर्म भरायला सुरुवात करा.संपूर्ण फॉर्म भरल्यानंतर जनरेट होणारे ई चलन विद्यापीठाने नियुक्त केलेल्या बँकेत भरा. बँकेने तुमच्या चलनावर ट्रँझॅक्शन नंबर टाकला आहे याची खात्री करुन घ्या.प्रोसेसिंग शुल्क खुल्या प्रवर्गासाठी 400₹ तर राखीव प्रवर्गांसाठी 200₹ भरावयाचे आहेत. किंवा Netbanking द्वारे देखील फीस भरण्याचा पर्याय उपलब्ध आहे .

💥9) आता परत एकदा आपल्याला अॉनलाईन जाऊन क्र.1 व 2 मधील सूचनेनूसार बि.एड. प्रवेश प्रक्रियेचे पेज ओपन करावे लागेल व पूर्वीच आपल्याकडे असलेल्या *Login ID व पासवर्डने* आपला फॉर्म ओपन करुन  *pay application Fee* यात आपल्या ई चलनावरील ट्रँझॅक्शन नंबर भरुन आपला फॉर्म अॉथेंटीक करावा लागेल.
  या सर्व पाय-या यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर आपल्याला आपला प्रवेश अर्ज भरला गेल्याचा मेसेज
येईल,ज्या विद्यार्थ्यांना असा मेसेज येईल तेवढेच अर्ज
प्रवेशासाठी विचाराधीन ग्राह्य धरले जातात असे माहिती पत्रकात सांगितलेले आहे , परंतु Netbanking द्वारे फीस भरल्यास असा मेसेज येत नसल्याचे बर्याच जणांनी कळविले आहे ,.
  यानंतरही गुणवत्ता यादीत आलेल्या उमेदवारांना मुलाखतीसंदर्भातील माहिती केवळ विद्यापीठाच्या वेबसाईटवरच कळविली जाते, तसेच गुणवत्ता
यादीसुद्धा वेबसाईटवरच प्रसिद्ध केली जाते.त्यामूळे
वेळोवेळी वेबसाईट ला भेट देणे ही उमेदवारांची
जबाबदारी आहे.
निवड प्रक्रिया/गुण देण्याची पद्धत -
1] अनुभवाच्या प्रत्येक वर्षासाठी 1गुण ,वरच्या 6 महिन्यापर्यंत 0 व 6
महिन्यांपेक्षा जास्त सेवेला एक गुण.   +
2] पदवीच्या श्रेणीला पुढीलप्रमाणे गुण O-6/A-5/B-4/C-0   +
3] पदव्युत्तर श्रेणीला पुढील प्रकारे गुण A किंवा O-5/B-4/C-3   +
4] डि.एस.एम. अथवा समकक्ष श्रेणीला पुढील प्रकारे गुण A किंवा O-5/B-4/C-3  +
5] पदवीधर वेतनश्रेणी मिळालेली असल्यास वेतनश्रेणी मिळाल्यानंतरच्या प्रत्येक वर्षासाठी एक अतिरिक्त गुण मिळतो,परंतु पाच वर्षात बी.एड. करणे आवश्यक असल्याचे नियोक्त्याचे प्रमाणपत्र आपल्याकडे असणे आवश्यक आहे .
  वरीलप्रमाणे गुणदान केल्यानंतर अंतिम गुणवत्ता यादीत समान गुण असतील तर प्रथम अनुभवाचा आणि नंतर वयानूसार ज्येष्ठतेचा विचार केला जातो जर वय देखील समान असेल तर पदवी उत्तिर्णतेची ज्येष्ठता विचारात घेत
ली जाते.
  वेळापत्रक:—    online अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिनांक 16 ऑगस्ट हा आहे.
  बि.एड. प्रवेश प्रक्रियेसाठी शिक्षक मित्रांना शुभेच्छा!!!
🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹
शरद कुरूंदकर,सहशिक्षक,किनवट,जि.नांदेड
 sharadkurundkar.blogspot.com                                               















                                                      

Thursday, 25 July 2019

पॅनकार्डशी आधार क्रमांक लिंक करणे



पॅनकार्डशी आधार क्रमांक लिंक करण्याची प्रक्रिया मोबाईलवरून सहजपणे अगदी एका मिनिटात पूर्ण करता येईल. खालील लिंक वर क्लिक करून continue वर क्लिक करा व  उघडणारा लहानसा फॉर्म भरा.यात आपला पॅन क्रमांक व आधार क्रमांक अचूकपणे भरा,आधार कार्डवर जसे नाव आहे तसेच इंग्रजीत भरा,आपल्या आधारकार्ड वर फक्त जन्मवर्ष असल्यास बॉक्समधे टीक करा, पूर्ण जन्मदिनांक असल्यास बॉक्स रिकामा असू द्या , I Agree समोरील बॉक्स मध्ये  टीक करा त्याखाली दिसणारा कॅप्चाकोड जशास तसा टाईप करा व शेवटी दिसणार्या Link Adhar वर क्लिक करा, लगेच तुमचा आधार क्रमांक पॅनकार्डशी यशस्वीपणे जोडल्या गेल्याचा मेसेज स्क्रिनवर दिसेल.धन्यवाद!
पॅनकार्डशी आधार क्रमांक जोडण्यासाठी खालील Clik Here या लिंकवर क्लिक करा.
   
                                                                     
                                                           

                           Clik Here


                         

Thursday, 18 July 2019

य.च.म.मु.वि. बि.एड.(विशेष शिक्षण )

          *YCMOU B.Ed. (विशेष शिक्षण ) साठी application फॉर्म भरणे सुरू झाले आहेत.*


                                                               
 Clik Here

Friday, 12 July 2019

आपला पासपोर्ट कसा तयार करावा ?

आपला स्वतःचा पासपोर्ट आपण घरबसल्या स्वतःच तयार करू शकतो ,त्यासाठी खालील लिंक वर उघडणार्या website वर जाऊन आपणास ऑनलाईन फॉर्म भरावा लागेल.  

                            PASSPORT SEVA HOME PORTAL   


ऑनलाईन फॉर्म भरायला सुरुवात करण्यापूर्वी जन्म तारखेचा पुरावा म्हणून दहावीची सनद व रहिवासी पुरावा म्हणून आधार कार्ड लाईट बिल व इतर पुराव्यामध्ये  pancard तसेच मतदार ओळख पत्र स्कॅन  करून तयार ठेवा. 


                         online Form Submission
Step 1Register through the Passport Seva Online Portal. (Click on "Register Now"  link on the Home Page).
Step 2Login to the Passport Seva Online Portal with the registered Login Id.
Step 3Click "Apply for Fresh Passport/Re-issue of Passport" link. While applying under Fresh Issuance category - please make sure you never held a Passport of the applied category (i.e. Ordinary Passport, Diplomatic Passport or Official Passport) in the past.

For instance, if you ever held an Ordinary passport (Deep Blue colour) in the past but never held any Diplomatic (maroon colour) or Official (white colour) passport - you need to apply under Reissue category if applying for an Ordinary Passport while choose the Fresh category if applying for a Diplomatic or Official passport. Similarly, if you have/held a Diplomatic (or Official) Passport but do not have/held an Ordinary Passport - you need to apply for Ordinary Passport under Fresh category while choose the Reissue category if applying for Diplomatic (or Official) passport.
Step 4Fill in the required details in the form and submit.
Step 5Click the "Pay and Schedule Appointment" link on the "View Saved/Submitted Applications" screen to schedule an appointment.

Online Payment has been made mandatory for booking appointments at all Passport Seva Kendras/Passport Offices.
Online Payment can be made using any one of the following modes:
  • Credit/Debit Card (MasterCard and Visa)
  • Internet Banking (State Bank of India (SBI) and Associate Banks and Other Banks)
  • SBI Bank Challan
Step 6Click the "Print Application Receipt" link to print the application receipt containing Application Reference Number (ARN)/Appointment Number.
Note: Carrying printout of Application Receipt is no longer required. An SMS with your appointment details is also accepted as proof of appointment during your visit to Passport Office.
Step 7Visit the Passport Seva Kendra (PSK)/Regional Passport Office (RPO) where appointment has been booked, along with original documents.

Sunday, 19 May 2019

महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय विश्वविद्यालय वर्धा -सेवांतर्गत बीएड




महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय विश्वविद्यालय वर्धा तर्फे -सेवांतर्गत बी.एड. साठी  अर्ज करण्यास सुरुवात झाली असून ३१ मे हा online अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक आहे.
अर्ज दाखल करण्यासाठी                            येथे क्लिक करा



अभ्यास केंद्रांची सूची  download करण्यासाठी येथे क्लिक करा






Friday, 22 February 2019

Wednesday, 16 January 2019

विद्यार्थी भाषणे संग्रह

विद्यार्थी भाषणे pdf फाईल्सचा संग्रह पाहण्यासाठी व डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

                    विद्यार्थी भाषणे संग्रह